'त्या' कन्येसाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री ठरले पित्यासमान!

वृत्तसंस्था
शनिवार, 10 डिसेंबर 2016

भोपाळ : भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून पळून जाताना दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले तुरुंगातील सुरक्षा रक्षक रमाशंकर यादव यांच्या कन्येच्या विवाहात उपस्थित राहून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. नोकरीच्या नियुक्तीपत्राच्या स्वरुपात चौहान यांनी रमाशंकर यांच्या कन्येला अनोखी भेटही दिली.

शुक्रवारी रात्री रमाशंकर यांची कन्या सोनिया हीचा सुनिलसोबत विवाह संपन्न झाला. हलालूपरमधील उद्यानात हा विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवराजसिंह यांनी समारंभात हजेरी लावत उपस्थितांचे स्वागत केले. शिवाय त्यांनी सोनियाला तृतीय श्रेणीतील शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन अनोखी भेट दिली आहे. शिवराजसिंह यांनी सोनियाच्या विवाहसाठी शक्‍य ती सर्व मदत देऊ केली होती. वडिलांची कमतरता जाणवू नये यासाठी त्यांनी सर्व तयारीवर लक्ष ठेवले होते. शिवाय विवाहापूर्वी विवाहाच्या तयारीकडे लक्ष देण्यासाठी विवाहस्थळी उपस्थिती लावली होती.

सिमी या दहशतवादी संघटनेचे आठ दहशतवादी भोपाळ मध्यवर्ती तुरुंगात होते. तीस ऑक्‍टोबरच्या रात्री रमाशंकर यांच्यावर हल्ला करून हे दहशतवादी तुरुंगातून फरार झाले होते. मात्र त्यानंतर काही तासातच भोपाळ पोलिसांनी त्यांचा शोध घेतला होते. यावेळी पोलिस आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत आठ दहशतवादी ठार करण्यात आले होते.

Web Title: CM Shivrajsingh Chauhan attends wedding ceremony of ramashankar daughter