
मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतील. आज (ता. ७) सकाळीच ते अयोध्येला रवाना झाले असून त्यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे व पुत्र कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत.
मुंबई : मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतील. आज (ता. ७) सकाळीच ते अयोध्येला रवाना झाले असून त्यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे व पुत्र कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. याशिवाय ठाकरेंसह शिवसेनेचे काही महत्त्वाचे मंत्री असून खासदार संजय राऊत त्यांना लखनौला भेटतील.
'अयोध्येला जाताय तेव्हा जनाची नाही किमान मनाची तरी...' मनसेच्या शुभेच्छा!
महाविकासआघाडी सरकारला आज १०० दिवस पूर्ण होतील. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याचे आयोजन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्माणाचा निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री प्रथमच अयोध्या दौऱ्यावर जातील. आज सकाळी ते ११ वाजता लखनौला जातील व तेथून अयोध्येकडे कूच करतील. दुपारी रामलल्लाचे दर्शन घेतील व संध्याकाळी शरयू नदीवर आरतीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे ही आरती रद्द करण्यात आली आहे. रात्री ते पुन्हा मुंबईला परततील.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
Mumbai: Maharashtra Chief Minister and Shiv Sena Chief Uddhav Thackeray leaves for Ayodhya. pic.twitter.com/AiG08QyR3M
— ANI (@ANI) March 7, 2020
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे. संजय राऊत यांनी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर आदित्यनाथ यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी गर्दी टाळण्याची विनंतीही केली आहे.