उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ल्याचा इशारा

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

लखनौ- उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ल्याचा इशारा मध्य प्रदेशातील गुप्तचर विभागाने दिला आहे. साधूचे कपडे घातलेली लहान वयाची मुले दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारी असल्याचे म्हटले आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील महत्त्वाची कार्यालये, रेल्वे स्टेशनवर दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्याही सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

Web Title: cm yogi adityanath security increased against threat attack in uttar pradesh