लखनौच्या खवय्यांसाठी आता "योगी आंबा' 

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

लखनौमध्ये आजपासून सुरू झालेल्या आंबा महोत्सवात खवय्यांना सातशेपेक्षा जास्त जातींचे आंबे चाखण्याची संधी लाभणार आहे. मात्र, यंदाचे आकर्षण आहे "योगी आंबा.' उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी यांचे नाव आंब्याच्या या नव्या जातीला देण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 725 जातींचे आंबे खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. 
 

लखनौ - लखनौमध्ये आजपासून सुरू झालेल्या आंबा महोत्सवात खवय्यांना सातशेपेक्षा जास्त जातींचे आंबे चाखण्याची संधी लाभणार आहे. मात्र, यंदाचे आकर्षण आहे "योगी आंबा.' उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी यांचे नाव आंब्याच्या या नव्या जातीला देण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 725 जातींचे आंबे खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. 

आंब्याच्या उत्पादनासाठी प्रख्यात असलेल्या मलिहाबादमधील "मॅंगो मॅन' या नावाने प्रसिद्ध असलेल्या हाजी कलिमुद्दीन यांनी "योगी आंबा' विकसित केला आहे. गेल्या वर्षी त्यांनी या आंब्याबाबत प्रयोग सुरू केले आणि यंदा तो बाजारात दाखल होण्यापूर्वी महोत्सवात सादर करण्यात आला आहे. मलिहाबादच्या दशहरी आंब्याप्रमाणे "योगी आंबा' ही हायब्रिड व्हरायटी असल्याचे कलिमुद्दीन यांनी सांगितले. दशहरी आंब्याप्रमाणेच हा आंबाही लहान आकाराचा असून, त्याची साल गुलाबी आणि पिवळी आहे. "योगी आंबा' सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करण्यात आला असून, दशहरीपेक्षा त्याचा टीकाऊपणा जास्त आहे, असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर कलिमुद्दीन यांनी 2015 मध्ये "नमो आंबा' उत्पादित केला होता. 

Web Title: Cm Yogi Inaugurated Mango Festival In Lucknow