मौलवींनी दिलेली टोपी घालण्यास योगींचा नकार

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 जून 2018

यापूर्वी 2011 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सद्भभावना उपवासादरम्यान एका मुस्लिम मौलानाकडून देण्यात आलेली टोपी घातली नव्हती. त्यानंतर आता योगींनीही टोपी घालण्याचे टाळले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संत कबीर नगर दौऱ्यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संत कबीरनगरच्या मगहरमधील कबीर दर्ग्यात जाऊन तयारीची माहिती घेतली. यादरम्यान दर्ग्याच्या मौलवींनी त्यांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी त्यांचा हात पकडून टोपी दूर करत टोपी घालण्याचे टाळले.

यापूर्वी 2011 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सद्भभावना उपवासादरम्यान एका मुस्लिम मौलानाकडून देण्यात आलेली टोपी घातली नव्हती. त्यानंतर आता योगींनीही टोपी घालण्याचे टाळले. कबीर यांच्या 500 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदी गुरुवारी उत्तरप्रदेशातील संत कबीर नगरमध्ये येणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी एका रॅलीलाही संबोधित करणार आहेत.

तसेच कबीर यांच्या दर्ग्याच्या ठिकाणी चादरही चढवणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संत कबीर नगरच्या मगहरमध्ये पोचले होते. येथे पोचल्यानंतर मौलवींनी त्यांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, योगींनी मौलवींचा हात पकडून टोपीला बाजूला केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Yogi refuses to wear Muslim skullcap at saint Kabirs Mazaar