नैसर्गिक वायुदरात सहा टक्‍क्‍यांनी वाढ

पीटीआय
शुक्रवार, 30 मार्च 2018

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नैसर्गिक वायूंच्या दरामध्ये सहा टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ गेल्या दोन वर्षांमधील सर्वाधिक असून याचा थेट परिणाम सीएनजी व घरगुती वापराच्या इंधनावर होणार आहे. 

तेल मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार एक एप्रिलपासून सहा महिन्यांसाठी एक दशलक्ष ब्रिटिश थर्मल एककाला (एमएमबीटीयू) 3.06 डॉलर अशी खरेदी करण्यात येणार आहे. याआधी 2.89 डॉलरला ही खरेदी करण्यात येत होती.

जादा गॅसचा साठा असलेल्या देशांच्या (अमेरिका, रशिया, कॅनडा) पुरवठ्याच्या सरासरीनुसार नैसर्गिक वायूचे दर सहा महिन्याला बदलत असतात. भारतामध्ये स्थानिक दराच्या दुप्पट किंमतीने गॅसची आयात करण्यात येते. या आधी एप्रिल ते सप्टेंबर 2016 मध्ये याआधी सर्वाधिक इंधनदरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता ही दरवाढ करण्यात आली आहे. 

तेलदराच्या वाढीमुळे ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या तेलकंपन्यांना तेलदरवाढ करण्यास वाव मिळणार आहे. यासह सीएनजी आणि घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीही वाढणार आहेत. वाढत्या गॅसदराचा फटका युरिया आणि ऊर्जानिर्मितीलाही होणार आहे.

Web Title: CNG, LPG prices will be affected due to rise in Natural Gas rates