निवासी वसाहतींमध्ये दिल्लीत 'सीएनजी' पंप 

निवासी वसाहतींमध्ये दिल्लीत 'सीएनजी' पंप 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील "सीएनजी' वितरण कंपनी इंद्रप्रस्थ गॅसने शहरातील "सीएनजी' पंपांवरील गर्दी कमी करण्यासाठी निवासी वसाहतींमध्ये "सीएनजी' पंप स्थापन करण्याचा विचार करीत आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ई. एस. रंगनाथन यांनी दिली. 

इंद्रप्रस्थ गॅस राजधानी दिल्ली आणि उपनगरांमध्ये वाहनांना सीएनजी आणि घरांमध्ये पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरविते. कंपनीच्या सीएनजी पंपांवर लागत असलेल्या रांगा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कंपनीने पावले उचलावीत, अशी मागणी होत होती. कंपनीने नोएडातील एका निवासी वसाहतीमध्ये प्रायोगिक तत्वावर सीएनजी पंप सुरू केला आहे.

याबाबत रंगनाथन म्हणाले, ""आम्हाला निवासी वसाहतींमध्ये केवळ 10 बाय 10 मीटर जागा हवी आहे. ही जागा केवळ चार मोटारी उभ्या करता येतील एवढी आहे. या जागेत सीएनजी पंप सुरू करण्यात येईल. निवासी वसाहतींमधील नागरिकांना या केंद्रावर प्राधान्याने सेवा मिळेल. चालू अर्थिक वर्षात 60 सीएनजी पंप सुरू करण्यात येणार असून, आणखी दोन लाख घरांमध्ये पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरविला जाईल.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com