नक्षल्यांना यशस्वी होऊ देणार नाही: राजनाथ

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

हा हल्ला नैराश्‍यामधून करण्यात आला आहे. आदिवासी भागामध्ये होणाऱ्या विकासकामांस नक्षलवाद्यांचा विरोध आहे. मात्र आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही,

नवी दिल्ली - सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला ही "निर्दय हत्या' असून नक्षलवाद्यांकडून आदिवासींचा "ढाल' म्हणून वापर केला जात असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (मंगळवार) केली.

नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 25 जवान हुतात्मा झाले आहेत. सिंह यांनी आज या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

"हा हल्ला नैराश्‍यामधून करण्यात आला आहे. आदिवासी भागामध्ये होणाऱ्या विकासकामांस नक्षलवाद्यांचा विरोध आहे. मात्र आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही,'' असे सिंह म्हणाले. सिंह हे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास रायपूर येथे दाखल झाले. यावेळी छत्तीसगड राज्याचे राज्यपाल बलरामजी दास टंडन, मुख्यमंत्री रमण सिंह, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर व इतर उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

Web Title: This is a cold-blooded murder, says Home Minister Rajnath Singh