थंडीच्या लाटेने उत्तर भारत गारठले; पंजाबमध्ये नीचांकी तापमानाची नोंद

पीटीआय
Sunday, 20 December 2020

सिमला आणि काश्‍मीरमधील हिमवृष्टीनंतर आता दिल्लीत कडाक्याची थंडी पडत आहे. दिल्लीच्या जाफरपूरचे तापमान सिमल्याप्रमाणे झाले आहे. या ठिकाणी किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी नोंदले गेले. अमृतसर शहरात थंडीने गेल्या दहा वर्षाचा विक्रम मोडला. या शहरातील तापमान ०.४ अंश सेल्सिअसवर पोचले आहे.

नवी दिल्ली - सिमला आणि काश्‍मीरमधील हिमवृष्टीनंतर आता दिल्लीत कडाक्याची थंडी पडत आहे. दिल्लीच्या जाफरपूरचे तापमान सिमल्याप्रमाणे झाले आहे. या ठिकाणी किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी नोंदले गेले. अमृतसर शहरात थंडीने गेल्या दहा वर्षाचा विक्रम मोडला. या शहरातील तापमान ०.४ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. जालंधरचे तापमान १.६ अंश सेल्सिअस राहिले . बिहारची राजधानी पाटण्यातही थंडी वाढली असून तेथे एका दिवसात तापमान ४ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. 

राजस्थानात थंडीची लाट कायम आहे. गेल्या चोवीस तासात बहुतांश शहरातील तापमान ३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. बहुतांश ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिले. काल रात्री देखील राज्यातील सरासरी तापमान ७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले आहे. माउंट अबू, चांदननंतर आता चुरू, जोबनेर येथे तापमान उणे झाले आहे. जोबनेर आणि माउंट अबू येथे तापमान उणे २.५ आणि चुरू येथे उणे ०.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मध्य प्रदेशात सहा शहरातील तापमान ५-६ अंशावर
राजधानी भोपाळसह मध्य प्रदेशात कडाक्याची थंडी पडत आहे. काल भोपाळमध्ये हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली. तेथे किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यात थंड वारे वाहत असून प्रदेशातील सहा शहरात ५ ते ६ अंशाच्या आसपास तापमान राहिले. तसेच २३ शहरात १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिले.

राहुल गांधींकडे पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची धूरा? बैठकीत स्पष्ट संकेत

पंजाबमध्ये कडाका
पंजाबमध्ये थंडीची लाट आली असून अमृतसर येथील तापमानाने गेल्या दहा वर्षातील विक्रम मोडला आहे. या ठिकाणी किमान तापमान ०.४ अंश सेल्सिअस राहिले. जालंधर-कपूरथला येथे १.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंडीमुळे सकाळच्या वेळी दाट धुके पडत आहे. गेल्या वर्षी सकाळी तापमान वेगाने घसरत होते आणि रात्री वाढत होते. मात्र यावेळी ही सायकल बदलल्याचे हवामान खात्याचे संचालक डॉ. सुरिंदर पाल यांनी सांगितले. चंडीगड येथे देखील तापमानात घसरण होत आहे. तेथे ४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold wave hits North India Punjab records low temperature