पंजाब, हरियानात थंडीचा कडाका कायम

पीटीआय
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

चंडीगड : पंजाब आणि हरियानात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कायम आहे. बुधवारी अनेक ठिकाणी तापमानाचा पारा सामान्य पातळीपेक्षा खाली गेला आहे. पंजाबमध्ये तापमानात घट होऊन पारा 1.5 अंश सेल्सिअसवर गेला आहे, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

फरीदकोटमध्येही पारा 2.5 अंशांवर स्थिर झाला आहे, तर भटिंडामध्ये तीन अंश तापमान नोंदविले गेले. त्याशिवाय अमृतसरमध्ये3.6, हलवारामध्ये 4.8, लुधियाना 4, पतियाळा 5.6, पठाणकोट 5 आणि गुरदासपूर 5 अंश सेल्सिअस असे रात्रीचे तापमान नोंदविले गेले. 

हरियानात नरनौल हे सर्वांत जास्त थंड ठिकाण ठरले आहे. तेथे सर्वांत कमी म्हणजे 2.3 अंश तापमान नोंदविले गेले आहे. त्याखालोखाल कर्नाल 5, रोहतक 4.6, सिरसा 5.4 आणि भिवानी 5.3 अंश किमान तापमान नोंदविले गेले आहे. अंबाला येथे 6.7 अंश तापमान झाले आहे. चंडीगड ही दोन्ही राज्यांची राजधानी असून, तेथे 5.4 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसांत या दोन्ही राज्यांत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Web Title: Cold wave sweeps in Punjab Haryana