प्राप्तिकराचे संकलन 10 लाख कोटी 

पीटीआय
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

गुवाहाटी : मागील आर्थिक वर्षात देशातील प्राप्तिकर संकलन 10.03 लाख कोटी रुपयांवर गेले, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली आहे. 

गुवाहाटी : मागील आर्थिक वर्षात देशातील प्राप्तिकर संकलन 10.03 लाख कोटी रुपयांवर गेले, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली आहे. 

प्राप्तिकर अधिकाऱ्यांची दोनदिवसीय परिषद येथे सुरू आहे. या परिषदेत बोलताना "सीबीडीटी'च्या सदस्या शबरी भट्टसाली म्हणाल्या, "आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 6.92 कोटी नागरिकांनी प्राप्तिकर विवरणपत्रे भरली. त्याआधीचे आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 5.61 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली होती. मागील आर्थिक वर्षात 1.31 कोटी विवरणपत्रांची वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात 1.06 कोटी विवरणपत्रे नव्या करदात्यांकडून भरण्यात आली आहेत. चालू वर्षात 1.52 कोटी नवे करदाते विवरणपत्रे भरण्याची शक्‍यता आहे.'' 

"प्राप्तिकर विभागाच्या ईशान्य विभागाचे करसंकलन मागील आर्थिक वर्षात 7 हजार 97 कोटी रुपये होते. त्याआधीच्या वर्षात हे संकलन 6 हजार 82 कोटी रुपये होते. यात 16.7 टक्के वाढ झाली. चालू आर्थिक वर्षात ईशान्य विभागातील करसंकलनाचे उद्दिष्ट 8 हजार 357 कोटी रुपये आहे. मागील वर्षीपेक्षा हे उद्दिष्ट 17.75 टक्के अधिक आहे,'' असे ईशान्य विभागाचे प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त एल. सी. जोशी रानी यांनी सांगितले. 

Web Title: Collection of income tax 10 lakh crores