अभिषेकासाठी आणलेल्या दुधाचे बेळगावातील कपिलेश्वर मंदिरात संकलन

अभिषेकासाठी आणलेल्या दुधाचे बेळगावातील कपिलेश्वर मंदिरात संकलन

बेळगाव - महाशिवरात्रीनिमित्त शहर आणि परिसरातील शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे.

या ठिकाणी भाविकांना मूर्तींवर दुधाचा अभिषेक न करता दूध देण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कपिलेश्वर मंदिर येथे सकाळपासुन  अभिषेकासाठी आलेले 200 हुन अधिक लिटर दुधाचे संकलन करण्यात आले. तसेच भक्तांकडून स्वीकारण्यात आलेल्या दुधाचे दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये वाटप आले.

गेल्या तीन वर्षांपासून कपिलेश्वर मंदिर येथे भाविकांनी आणलेल्या दुधाचे संकलन करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. याला पहिल्या वर्षीपासून प्रतिसाद मिळत आहे. यावेळीही भक्तांना दुधाची नासाडी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला पहाटे पासूनच भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

महाशिवरात्रीनिमित्त कपिलेश्वर मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच महिला व पुरुषांसाठी दर्शनासाठी वेगवेगळी सोय करण्यात आली आहे.

कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्री दिवशी गर्दी होते हे लक्षात घेऊन दर्शनासाठी विशेष सोय करण्यात आली असून भाविकांकडून दुधाचे संकलन केले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी दुधाची नासाडी कमी होण्यास मदत मिळत आहे.

- सुनील बाळेकुंद्री, अध्यक्ष, कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com