महाविद्यालये सुरू, विद्यार्थी गैरहजर

Article 370
Article 370

श्रीनगर - कलम ३७० हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद असलेली महाविद्यालये आज सुरू झाली. मात्र विद्यार्थी हजर न राहिल्याने प्रशासनाच्या प्रयत्नास यश आले नाही. दरम्यान, आज ६६ व्या दिवशीही श्रीनगर शहरातील बहुतांश भागातील बाजारपेठ बंदच होती. 

जम्मू आणि काश्‍मीरचे विभागीय आयुक्त बशीर खान यांनी गेल्या आठवड्यात शाळा ३ ऑक्‍टोबर रोजी आणि महाविद्यालय ९ ऑक्‍टोबर रोजी सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज सकाळी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली, मात्र विद्यार्थी कॉलेजकडे फिरकले नाहीत. प्रशासनाने व्यापक पातळीवर प्रयत्न करूनही आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था असतानाही काश्‍मिरी महाविद्यालयीन विद्यार्थी घरीच बसले. यादरम्यान प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात पाठविण्यासंदर्भात पालकांनाही आवाहन करण्यात आले होते. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे काश्‍मीर खोऱ्यातील जनजीवन ६६ व्या दिवशीही विस्कळितच राहिले. 

कृष्णाघाटीत गोळीबार
पूँच जिल्ह्यातील सीमेलगत कृष्णाघाटी सेक्‍टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. या वेळी भारतानेही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख उत्तर दिले. या मुळे सीमावर्ती भागातील नागरिकात भीतीचे वातावरण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com