महिलांना स्पर्श केला तर बसणार विजेचा झटका 

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

मुरादाबाद येथील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेच्या पाच विद्यार्थ्यांनी एक नवीन उपकरण बनवले आहे, ज्यामुळे महिला अधिक सुरक्षित राहू शकतील. या विद्यार्थ्यांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी एक जॅकेट तयार केले आहे. यामध्ये जॅकेट घातलेल्या महिलेला स्पर्श केल्यास विजेचा झटका बसणार आहे. त्याचबरोबर या जॅकेटमुळे त्या महिलेचे जीपीएसच्या आधारे ठिकाणही संबधिताना समजणार आहे.

मेरठ (उत्तरप्रदेश) - मुरादाबाद येथील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेच्या पाच विद्यार्थ्यांनी एक नवीन उपकरण बनवले आहे, ज्यामुळे महिला अधिक सुरक्षित राहू शकतील. या विद्यार्थ्यांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी एक जॅकेट तयार केले आहे. यामध्ये जॅकेट घातलेल्या महिलेला स्पर्श केल्यास विजेचा झटका बसणार आहे. त्याचबरोबर या जॅकेटमुळे त्या महिलेचे जीपीएसच्या आधारे ठिकाणही संबधिताना समजणार आहे.

शिवम श्रीवास्तव, राजीव मौर्या, नितिन कुमार, निखिल कुमार आणि ऋषभ भटनागर अशी या जॅकेट बनवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात आहेत. 

आपत्कालीन वेळेस त्या महिलेने जॅकेटच्या डावीकडे असलेले बटण दाबल्यास त्या व्यक्तीला विजेचा झटका लागेल. तसेच, जॅकेटमध्ये फीड असलेल्या मोबाईल क्रमांकावर त्या महिलेचे सध्यस्थितीचे ठिकाण पाठवले जाईल. त्याचबरोबर या जॅकेटमध्ये एक कॅमेराही बसवण्यात आला आहे, त्यात घटना कैद होईल. असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

Web Title: College students design women’s jacket which gives electric shock if wearer is touched