काश्‍मीरमध्ये महाविद्यालये बंदच

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

श्रीनगर: काश्‍मीर खोऱ्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे आज पाचव्या दिवशीही महाविद्यालयांतील वर्ग बंदच राहिले. काश्‍मीर मंडलाचे आयुक्त बशीर खान यांनी बैठक बोलावून काश्‍मिरातील शिक्षण संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानुसार पाचव्या दिवशीही शैक्षणिक कामकाज स्थगित ठेवण्याचे आदेश दिले. या बैठकीत विविध कॉलेजच्या प्राचार्यांकडून महाविद्यालयात शांतता राखण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. तसेच, कालेजबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचे सांगण्यात आले.

पुलवामा येथील डिग्री कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असून, त्याचे लोण राज्यात पोचले आहे. त्यानंतर काश्‍मीर विद्यापीठासहित सर्व कॉलेज, माध्यमिक शाळा बंद करण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. खान यांनी बुधवारी आणखी दोन दिवस महाविद्यालये बंद ठेवण्याचे सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी पुन्हा आढावा घेण्यात आला.

Web Title: Colleges shut in Kashmir