मिनी ट्रक आणि लॉरीचा भीषण अपघात; ५ जण ठार

वृत्तसंस्था
Saturday, 28 March 2020

मिनी ट्रकमधून जवळपास 30 मजूर काम नसल्याने आपल्या गावी परतत होते. यावेळी ट्रकचा भीषण अपघात झाला. 

हैदराबाद : भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. मात्र, दुसरीकडे तेलंगणातील शमशाबादमध्ये एक भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व लोक आपआपल्या गावी परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती दिली जात आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप.

कोरोना व्हायरसमुळे सर्व व्यापार, दुकानं, व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहेत. त्यामुळे हजारो लोकांच्या हाताला काही काम नाही. त्यामुळे हे सर्व लोक आपआपल्या घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. ही घटना शमशाबाद येथे घडली. मिनी ट्रक आणि लॉरीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये वाहनाचा अक्षरश: चक्काचूर झाला. यामध्ये 5 जण ठार झाले असून, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

३० मजूर करत होते प्रवास

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना काम नाही. मिनी ट्रकमधून जवळपास 30 मजूर काम नसल्याने आपल्या गावी परतत होते. यावेळी ट्रकचा भीषण अपघात झाला. 

Image


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: collision between lorry and mini truck in Shamshabad Telangana