लाच घेताना कर्नलला अटक

वृत्तसंस्था
रविवार, 18 जून 2017

नवी दिल्ली - पुण्यातील एका कंपनीकडून लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज लष्करातील कर्नल पदावरील अधिकाऱ्याला कोलकत्यात अटक केली. सीबीआयने संबंधित कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांनाही अटक केली आहे.

कर्नल शैबल कुमार असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते कोलकता येथे लष्कराच्या पूर्व विभागात नियोजन आणि अभियांत्रिकी विभागात आहेत. लष्करासाठी खडी फोडण्याचे यंत्र घेण्यासाठी या अधिकाऱ्याने पुण्यातील एक्‍सटेक इक्विपमेंट प्रा. लि. या कंपनीकडून 1.80 लाख रुपयांची लाच मागितली होती, असे सीबीआयचे प्रवक्ते आर. के. गौर यांनी सांगितले. लाचेचा पहिला हप्ता म्हणून शैबल कुमार यांनी फेब्रुवारी महिन्यात पन्नास हजार रुपये स्वीकारले होते. पन्नास हजार रुपयांचा दुसरा हप्ता देण्यासाठी कंपनीचे संचालक कोलकत्याला आले होते. सीबीआयने त्यांचा माग काढला आणि शैबल कुमार यांनी लाच स्वीकारताच त्यांना आणि कंपनीचे संचालक विजय नायडू यांना अटक केली; तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरत नाथ, कंपनीचे प्रतिनिधी अमित रॉय यांनाही सीबीआयने अटक केली. सीबीआयने शैबल कुमार यांच्या घरूनही लाचेची रक्कम जप्त केली. सीबीआयने पुण्यातील दोन आणि कोलकत्यातील दोन ठिकाणी छापे घातले.

Web Title: colnel arrested marathi news new delhi india news