दिलासादायक! २४ तासांत झाले विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 31 मे 2020

सहा राज्यांत निम्मे रुग्ण झाले बरे
देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक आहे. त्यातील तमिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात जेवढे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, त्यापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सहा राज्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.

नवी दिल्ली - कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईतील आजचा दिवस भारतासाठी नवा आशेचा किरण घेऊन आला. मागच्या २४ तासांत ११ हजारांहून जास्त विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या या संपूर्ण काळात प्रथमच घटली. रूग्ण बरे होण्याचाही दर (रिकव्हरी रेट) आतापर्यंत सर्वाधिक ४७ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला गेला.

आणखी वाचा - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशात गेल्या २४ तासांत आणखी २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या पाच हजारापर्यंत पोहोचली आहे. मागच्या २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या ११,२६४ होती तर नवे ७,९६४  रुग्ण आढळले. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारांची संख्या जास्त असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

लॉकडाउनमधून सुटका नाहीच; देशभरात मुदत वाढवली

सहा राज्यांत निम्मे रुग्ण झाले बरे
देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक आहे. त्यातील तमिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात जेवढे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, त्यापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सहा राज्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comfortable A record number of patients were released in 24 hours