पोलिसांकडून सुरक्षित आणि नियंत्रित कम्युनिकेशनला प्राधान्य

police
police

पुणे : कार्यक्षम, सुरक्षित आणि संपूर्णपणे नियंत्रित कम्युनिकेशनसाठी देशातील क्षमतांचा उपयोग करत भारतीय पोलिस दलाने पोलिसमेल, डिजिटल रेडियो आणि मेसेंजरसहित सुरक्षित आणि जलद कम्युनिकेशन प्रणालीचा अंगीकार केला. देशात विकसित करण्यात आलेल्या आयटी ऍप्लिकेशन्सचा स्वीकार करण्यात राजस्थान पोलिसांनी आघाडी घेतली.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जयपूर मधील पोलिस मुख्यालयात ही प्रगत कम्युनिकेशन प्रणाली लॉन्च केली. आणि याद्वारे, राज्यातील सुमारे एक लाख पोलिसांना डिजिटल रेडियो, ईमेल आयडी असलेला पोलीसमेल police.rajasthan.in या डोमेनवर आणि police.rajasthan.bharat (हिंदीत) वर तसेच राजकॉप मोबाइल ऍपमार्फत मेसेंजर कॅरियर यांचे पाठबळ मिळाले आहे. राजकॉप ऍपवर पोलिसमेल आणि कम्युनिकेशन सोल्युशन जयपूर स्थित आयटी कंपनी डेटा एक्सजेन या जागतिक इनोव्हेटर द्वारा रचण्यात आणि विकसित करण्यात आले आहे. यामुळे पोलिसदलाला एक कार्यक्षम, सुरक्षित आणि पूर्णपणे नियंत्रित कम्युनिकेशन सेवा मिळाली आहे.

शरत कविराज, डेप्युटी इंस्पेक्टर जनरल (कम्युनिकेशन्स), राजस्थान पोलिस म्हणाले, “या नवीन आणि ईमेल सेवेचा समवेश असलेल्या प्रगत कम्युनिकेशन प्रणालीमुळे कार्यक्षमता वाढेल. महत्त्वाच्या गोष्टी संबंधित अधिकार्‍यांना कळवण्यासाठी या सोल्युशन्सची मदत होईल. आमची अगोदरची ईमेल सेवा ही अधिकृतरीत्या नियंत्रित होती पण पोलिसमेल हे संपूर्णपणे एकेक पोलीसाद्वारे नियंत्रित  होईल. आता राज्याचे संपूर्ण पोलीस दल नवीन कम्युनिकेशन सोल्युशन्स द्वारे सुसज्ज आहे.”

ते म्हणाले, “दोन महीने आम्ही संपूर्ण प्रक्रिया तपासली आहे. आज, माननीय मुख्य मंत्र्यांनी अधिकृतरित्या आमची नवीन कम्युनिकेशन प्रणाली लॉन्च केली आहे. पोलिसमेल हा खूपच सुरक्षित असेल कारण संपूर्ण डेटा आमच्या स्वतःच्या सर्व्हरवर संग्रहित असेल, त्यामुळे डेटा चोरीचा किंवा ईमेल मार्फत सायबर हल्ल्यांचा धोका असणार नाही.” ही नवी प्रणाली स्वीकारल्यामुळे राज्यातील प्रत्येक पोलिसाशी आता या डिजिटल मंचांच्या माध्यमातून झटपट समन्वय साधता येईल. अधिकारी आपली स्वतःची चॅनल तयार करू शकतील आणि सहाय्यक स्टाफ त्या चॅनलमध्ये राहू शकतील. पोलिस आता जलद आणि सुरक्षितपणे ब्रॉडकास्ट आणि टेक्स्ट मेसेज पाठवू शकतील.

ICANN या आंतरराष्ट्रीय इंटरनेट संस्थेच्या युनिव्हर्सल अॅक्सेप्टन्स स्टीयरिंग ग्रुप (UASG)चे अध्यक्ष आणि डेटा एक्सजेन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. चे संस्थापक आणि CEO अजय डेटा म्हणाले, “एक्सजेनप्लस द्वारा संचालित कार्यक्षम आणि सुरक्षित कम्युनिकेशन प्रणालीची सुरुवात हा भारतात असलेल्या क्षमतांचा पुरावा आहे. एक्सजेनप्लस सुरक्षित आणि सक्षम एन्टरप्राइझ ईमेल सेवांसाठी टेक्नॉलॉजी सोल्युशन्स आणि इतर कम्युनिकेशन सोल्युशन्स पुरवते. आज राजस्थानात झालेल्या यशस्वी लॉन्च नंतर आम्हाला आशा आहे की, ही नवी प्रणाली संपूर्ण नियंत्रित, सुरक्षित आणि देशात विकसित झालेल्या कम्युनिकेशन सोल्युशन्ससाठी सर्व राज्यांमध्ये विस्तारित होईल.

पोलिसमेल द्वारे राजस्थान पोलीसने अधिकृत मेल आयडी (इंग्रजीत आणि हिंदीत) प्रदान केले आहेत, जे डेस्कटॉप किंवा राजकॉप अॅपवर उघडून त्याद्वारे संदेश पाठवता येतात.

मेसेज कॅरियर वैशिष्ट्याद्वारे पोलिस अधिकारी आपले स्वतःचे ग्रूप तयार करू शकतात आणि SSO ID द्वारे इतर अधिकार्‍यांना त्यात सामील करू शकतात व त्यांच्याशी टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ, इ. शेअर करून चॅट करू शकतात. सर्व जिल्हा पोलिस अधिकार्‍यांचा एक सुरक्षित ग्रुप सहज बनवता येऊ शकेल.

राजकॉप ऍपमध्ये सुरक्षा, वापरातील सुकरता आणि ऍक्सेसच्या दृष्टीने खास अशी वैशिष्ट्ये आहेत. यातील काही वैशिष्ट्ये देशात पहिल्यांदाच प्रयुक्त होत आहेत. वरिष्ठ अधिकारी आणि IT अधिकार्‍यांना वाटते की, या डिजिटल युगात एक सुरक्षित आणि संपूर्णपणे नियंत्रित कम्युनिकेशन्स प्रणाली, जी देशात तयार करण्यात आली आहे, भविष्यात देशात एक सशक्त डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उभारेल.

डेटा एक्सजेन टेक्नॉलॉजीविषयी
2010 मध्ये स्थापन झालेली डेटा एक्सजेन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. ही डेटा इन्फोसिस लि. ची एक समूह कंपनी आहे. जगातील सर्वात मोठ्या एंटरप्राइज ईमेल मॅनेजमेंट सोल्युशन प्रोव्हायडर कंपन्यांपैकी ही एक आहे. एक्सजेनप्लस ही या कंपनीची प्रस्तुती आहे, जे एक एंटरप्राइज ईमेल सर्व्हर असून ते ईमेल, ट्रानजॅक्शनल ईमेल, पुश मेल, ग्रूप ईमेल्स, चॅट, SMS, ई-मार्केटिंग आणि फॅक्सिंग यासारखे सुरक्षित युनिफाईड कम्युनिकेशन पुरवते. पुढच्या पिढीचा प्रीमियम ईमेल मंच बनून लहान व्यवसायांपासून ते मोठ्या उद्योगापर्यन्त सर्वांना एक सुरक्षित आणि किफायतशीर मंच देऊन ईमेल मार्केट प्लेसमध्ये जागतिक आघाडी घेण्याचे डेटा एक्सजेन टेक्नॉलॉजीसचे लक्ष्य आहे व त्यानुसार निरंतर इनोव्हेशन चालू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com