धक्कादायक : 'टेरर फंडिंग' कंपन्यांकडून भाजपलाही देणग्या

companies which are under probe for terror funding also funded bjp
companies which are under probe for terror funding also funded bjp

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याच्याप्रकरणी ज्या कंपन्यांची (टेरर फंडिंग) चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करीत आहेत, त्याच कंपन्यांकडून भातीय जनता पक्षाने देणग्या घेतल्याची माहिती उघड झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या आर्थिक माहितीत भाजपनेच ही बाब जाहीर केल्याचा दावा दी वायर या इंग्रजी पोर्टलने केला आहे.

काय आहे मुंबई बॉम्ब स्फोट कनेक्शन?
दी वायरने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे की, निवडणूक आयोगाला माहितीनुसार "आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेड' नावाच्या कंपनीने सत्ताधारी भाजपला मोठा निधी दिला आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटातील आरोपी आणि कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा हस्तक इक्‍बाल मेनन उर्फ इक्‍बाल मिर्ची याची मालमत्ता खरेदी करणे आणि त्याच्याशी व्यवहार केल्याबद्दल "आरकेडब्ल्यू'ची चौकशी "ईडी' करीत आहे. दिवाळखोरीत निघालेल्या "दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड' (डीएचएफएल) या कंपनीशी संबंधित असलेल्या "आरकेडब्ल्यू'ने भाजपला 2014-15मध्ये दहा कोटी रूपयांची देणगी दिली होती. अन्य एका वृत्तसंस्थेने ही बाब जानेवारी महिन्यात उडकीस आणली होती, असे सांगण्यात आले.

सर्वांत मोठी देणगीदार कंपनी
भाजपकडून नियमित स्वरूपात निवडणूक ट्रस्टकडून देणग्या स्वीकारल्या जातात. हे ट्रस्ट कॉर्पोरेट घराण्यांशी संबधित असून तेथून हे पैसे आलेले असतात. आतापर्यंत एकाही कंपनीने "आरकेडब्ल्यू'एवढा निधी भाजपला दिलेला नाही. कंपनीचे माजी संचालक रणजित बिंद्रा याला "अंडरवर्ल्ड'च्या वतीने अनेक व्यवहार केल्याच्या आरोपावरून "ईडी'ने त्यांना अटक केलेली आहे. एवढेच नाही तर "मिर्ची'ची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी "ईडी'ने सनब्लिंक रियल इस्टेट या कंपनीवर आरोपी ठेवले आहेत. "सनब्लिंकचे संचालक मेहुल अनिल बविशी हे "स्किल रियल्टर्स प्रा. लि.' या कंपनीचेही संचालक आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार "स्किल रियल्टर्स'कडून भाजपला 2014-15 या वर्षात दोन कोटी रुपयांची देणगी मिळालेली आहे. "आरकेडब्ल्यू'चे अन्य एक संचालक प्लेसिड जेकब नरोन्हा हे दर्शन डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीचेही संचालक आहेत. दर्शन डेव्हलपर्सने 2016-17मध्ये भाजपला साडेसात कोटीचा निधी दिला आहे.

राज कुंद्राचीही चौकशी 
बिंद्रा हा इक्‍बाल मिर्ची आणि कंपन्यांसाठी सौदे करणारा दलाल असल्याचे "ईडी'च्या हवाल्यावरुन सांगण्यात येते. "आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स' च्या व्यवहाराबाबत प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा यांची चौकशी "ईडी'ने केली होती. शिल्पा शेट्‌टी ही "इसेन्शियल हॉस्पिटॅलिटी' या कंपनीची संचालक होती. या कंपनीने "आरकेडब्ल्यू'शी व्यवहार केला होता. 

भाजपला देणग्या (रुपयांत)

  • 10 कोटी
  • आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेड
     
  • 2 कोटी
  • सनब्लिंक रियल इस्टेट
     
  • 7.5 कोटी
  • दर्शन डेव्हलपर्स

आणखी बातम्या वाचा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com