कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा या कंपनीने केला

Sakal | Tuesday, 14 July 2020

बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. हे औषध कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वापरता येऊ शकेल, असा त्यांचा दावा आहे. या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (डीसीजीआय) मान्यतेनंतर त्याचा वापर सुरू करण्यात येणार आहे. या औषधाच्या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये असेल. बहुतांश रुग्णांना चार इंजेक्शनची गरज भासेल. एकूणच या थेरपीची किंमत ३२ हजार रुपये असेल.

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाचा प्रसार देशात दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर उपयोगी ठरू शकणारे औषध तयार केल्याचा दावा बायोकॅन कंपनीने केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. हे औषध कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वापरता येऊ शकेल, असा त्यांचा दावा आहे. या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (डीसीजीआय) मान्यतेनंतर त्याचा वापर सुरू करण्यात येणार आहे. या औषधाच्या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये असेल. बहुतांश रुग्णांना चार इंजेक्शनची गरज भासेल. एकूणच या थेरपीची किंमत ३२ हजार रुपये असेल.

ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिराचा खजिना राजघराण्याकडे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

प्लेग सोरायसीयवर उपचारासाठी बायोकॉन कंपनीने २०१३ मध्ये अल्झूमॅब हे औषध तयार केले होते. त्यात सुधारणा करून कोरोना विषाणूच्या संसर्गावरील औषध तयार करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

जगात पहिल्यांदाच इटोलीझुमॅबच्या रूपाने बायोलॉजिकल थेरपीला मंजुरी देण्यात आलीय असे बायोकॉनकडून सांगण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची मध्यम ते गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या, श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल.

काँग्रेसचा राजस्थानचा गड वाचवायला महाराष्ट्र धावला?

एक इंजेक्शन २५एमजी/५एमएल या प्रमाण असेल. कोविड -१९मुळे `सायटोकिन रिलीज डिस्ट्रेस` झालेल्या रुग्णांना याचा उपयोग होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुजुमदार शॉ यांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Prashant Patil