गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागाराबाबत तक्रार

Complaint about Goa Medical College Morgue
Complaint about Goa Medical College Morgue

पणजी - मृतदेहाची अदलाबदल होऊन यानूश गोन्सालवीस या तरुणाच्या मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याची घटना ताजी असतानाच गोवा वैद्यकीय महाविद्यालय शवागारातील कोट्यवधींचा घोटाळा चर्चेत आला आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात 40 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक शवागार उभारण्यात आले मात्र ते आजतागायत वापरात आणलेच नाही, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते अॅड आयरीश रॉड्रिग्ज यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. या अत्याधुनिक शवागाराचे उद्घाटन 19 डिसेंबर 2013 रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले होते याकडे त्यांनी या तक्रारीतून लक्ष वेधले आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील शवागार चालत नाही. पाच वर्षे होऊनही ते वापरात आणले गेले नाही. त्यामुळे शवचिकीत्सेसाठी जुन्याच कोंदट जागेचा वापर करावा लागतो व जुनेच शवागार वापरावे लागते. नव्या शवचिकीत्सा कक्षासाठी कोट्यवधी रुपये खर्चून आणलेली टेबले गंजू लागली आहेत. हा प्रकल्प हाच एक मोठा घोटाळा असून त्याची दक्षता खात्याकरवी चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी गोवा साधन सुविधा विकास महामंडळावरही अॅड रॉड्रिग्ज यांनी तक्रारीत बोट ठेवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com