New Parliament Building : राष्ट्रपतींच्या जातीचा दाखला देत प्रक्षोभक विधान! केजरीवाल, खर्गेंविरोधात तक्रार दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Complaint filed against Arvind Kejriwal Mallikarjun Kharge and others for making citing caste of President Droupadi Murmu

New Parliament Building : राष्ट्रपतींच्या जातीचा दाखला देत प्रक्षोभक विधान! केजरीवाल, खर्गेंविरोधात तक्रार दाखल

New Parliament Building : नव्या संसद भवनाचे उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे, मात्र त्यापूर्वीच राजकीय गोंधळ सुरू. विरोधी पक्ष आणि सरकार या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

या प्रकरणात आता समुदायांमधील भेदभाव वाढवण्याच्या उद्देशाने नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमासंदर्भात राष्ट्रपतींच्या जातीचा उल्लेख करून प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. समुदाय/गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याच्या उद्देशाने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या आयोजनाच्या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जातीचा उल्लेख करत प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कलम 121,153A, 505 आणि 34 IPC अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठी भारत सरकारवर अविश्वास निर्माण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

उद्या, २८ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवन इमारतीचे लोकार्पण केले जाणार आहे. देशातील अनेक विरोधी पक्षांकडून याला विरोध केला जात आहे. संसदेच्या इमारतीचे उद्घाटन हे राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी करावे अशी विरोधकांची मागणी आहे. यादरम्या करण्यात आलेल्या वक्तव्यावरून आता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांच्यासह इतर नेत्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.