Loksabha 2019: मंत्रीपदाचा दर्जा दिलेले कॉम्प्युटर बाबा भाजपच्या विरोधात

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सर्वांचं लक्ष भोपाळ लोकसभा मतदारसंघावर आहे. भाजप सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन दिग्विजय सिंह यांनी भाजपविरोधात नवी रणनीती आखली आहे. हजारो साधूंना सोबत घेऊन कॉम्प्युटर बाबा यांनी दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ प्रचार सुरु केला आहे.

भोपाळः लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सर्वांचं लक्ष भोपाळ लोकसभा मतदारसंघावर आहे. भाजप सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन दिग्विजय सिंह यांनी भाजपविरोधात नवी रणनीती आखली आहे. हजारो साधूंना सोबत घेऊन कॉम्प्युटर बाबा यांनी दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ प्रचार सुरु केला आहे.

हिंदुत्त्व आणि कथित हिंदू दहशतवादासारख्या मुद्द्यांवरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु असताना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी हा नवा डाव खेळला असल्याचे सध्या बोलले जात आहे. यावेळी बोलताना कॉम्प्युटर बाबा यांनी नरेंद्र मोदींवर टीकाही केली. भाजपा सरकार गेली पाच वर्ष सत्तेत असूनही राम मंदिर उभारु शकलं नाही. आता राम मंदिर नाही तर मोदीपण नाही, असे कॉम्प्युटर बाबांनी स्पष्ट केले.

दरम्यान, साध्वी प्रज्ञा यांनी कॉम्प्युटर बाबा भगव्याचा व्यापार करत असल्याची टीका केली आहे. मला हे अजिबात सहन होत असंही त्यांनी म्हटलं आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ भोपाळमध्ये एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. कॉम्प्युटर बाबांकडे या रॅलीची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या रोड शोमध्ये जवळपास सात हजार साधू-संत सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Computer Baba has now switched side and is campaigning for Digvijaya Singh