बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदानाला गुरुवारी सुरुवात झाल्यानंतर किरकोळ हिंसाचाराच्या घटना घडल्या.
West Bengal Election
West Bengal ElectionSakal

कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदानाला गुरुवारी सुरुवात झाल्यानंतर किरकोळ हिंसाचाराच्या घटना घडल्या. ते वगळता मतदान शांततेत झाल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील ४३ मतदारसंघासाठी आज निवडणूक झाली. त्यापैकी १७ जागा उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील तर नदिया आणि उत्तर दिनाजपूरमधील प्रत्येकी नऊ, पूर्व वर्धमानमधील आठ जागा आहेत. अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या प्रसारामुळे सर्व मतदान केंद्रावर सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रत्येक मतदाराला करण्यात येत होते. अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

उत्तर दिनाजपूरमधील चोपडा भागातील मतदान केंद्रावर निवडणूक प्रतिनिधीने हटकल्याने तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होऊन गोळीबाराची घटना घडली. मात्र दोन्ही पक्षांनी गोळीबार केल्याचा इन्कार करीत हिंसाचाराला विरोधकांना जबाबदार धरले. केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनाकडून याचा अहवाल मागविला आहे.

West Bengal Election
कायदे रद्द केल्याशिवाय घरी परतणार नाही: राकेश टिकैत यांचा निर्धार

रायगंज येथे भाजपच्या कार्यकर्त्याने भोसकल्याने ‘तृणमूल’चा एक कार्यकर्ता जबर जखमी झाल्याचा दावा पक्षाने केला. भाजपने हा दावा फेटाळला आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बीजपूर मतदारसंघात मतदान केंद्राबाहेर तृणमूल आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यात तृणमूल काँग्रेसचे दोन व भाजपचे तीन समर्थक जखमी झाले. मतदानात गैरप्रकार केल्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर करण्यात आला. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा पाठविण्यात आला.

नयहाती मतदारसंघातील हलीसहर भागात भाजपच्या स्थानिक नेत्याच्या घरावर बाँब फेकण्यात आल्याचा आरोप पक्ष कार्यकर्त्यांनी केला. या हल्ल्यात संबंधित नेत्याची आई व लहान भाऊ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेवर ‘तृणमूल’ व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप -प्रत्यारोप करण्यात आले.

सहाव्या टप्प्यातील चित्र

४३ - मतदारसंघ

३०६ - उमेदवार

१४, ४८० - मतदान केंद्रे

१.०३ कोटी - मतदार

१,०७१ - केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात

West Bengal Election
प्लँट पुन्हा सुरु करु द्या, मोफत ऑक्सिजन देऊ; वेदांताची सुप्रीम कोर्टात याचिका

मतदारांवर दबाव?

बराकपूरचे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार राज चक्रवर्ती यांनी मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला होता. चक्रवर्ती यांनी हा आरोप फेटाळला.

कोरोनाच्या नियमांचे मतदारांकडून पालन

कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने गुरुवारी सहाव्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळी मतदार कोरोना नियमावलीचे पालन करीत असल्याचे चित्र दिसले.

आधीच्या टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रांवर आज बंदोबस्त ठेवला होता. त्याचबरोबर कोरोनामुळे मतदारांनी सर्व नियमांचे पालन करावे, यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती, असे निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मतदानासाठी रांगेत उभे राहिलेल्या मतदारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवलेले होते. ज्या मतदारांकडे मास्क नव्हते त्यांना मास्क पुरविण्यात आले. मतदानापूर्वी त्यांचे हात निर्जंतुक केले जात होते. मतदानासाठी महिलांत उत्साह होता.

मतदान अधिकाऱ्यांची हकालपट्टी

चोपडातील एका केंद्रावर एक व्यक्ती मतदान खोलीत सारखी प्रवेश करीत असल्याचे दिसले. यामुळे अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र अध्यक्षाला पाचारण केले तेव्हा ती व्यक्ती प्रथम मतदान अधिकारी असल्याचे समजले. मतदान केंद्र अध्यक्ष दोन तास केंद्रावर नसल्याचेही आढळले. याच्या चौकशीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकाऱ्याला हटविले व नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com