काँग्रेसच्या '27 साल, युपी बेहाल' यात्रेला प्रारंभ

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जुलै 2016

नवी दिल्ली - काँग्रेसने आज (शनिवार) पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत, ‘27 साल, युपी बेहाल‘ या यात्रेला प्रारंभ केला.

नवी दिल्ली - काँग्रेसने आज (शनिवार) पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत, ‘27 साल, युपी बेहाल‘ या यात्रेला प्रारंभ केला.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या बस यात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमापासून बस यात्रेला सुरवात झाली आहे. काँग्रेसने यापूर्वीच उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून शीला दीक्षित यांचे नाव जाहीर केले आहे. तर, उत्तर प्रदेशची जबाबदारी राज बब्बर यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. काँग्रेसच्या हातून 1989 मध्ये उत्तर प्रदेशातील सत्ता गेल्यानंतर उत्तर प्रदेशातील परिस्थिती बिकट झाल्याचे या यात्रेतून सांगण्यात येणार आहे.

काँग्रेसची ही यात्रा 29 जुलैला लखनौमध्ये पोहचल्यानंतर राहुल गांधी यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये 2 ऑगस्टला सोनिया गांधी रोड शो करणार आहेत. पुढील 45 ते 60 दिवसांत उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये यात्रेच्या माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे.

Web Title: Congress 27 years, suffering UP 'pilgrimage started