कुठ्ठाळ्ळी मार्गावरील चक्काजाम निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व महिला प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह सुमारे 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या रस्त्यावर नेहमीच चक्काजाम होत असल्याने वाहन चालकांमधून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

पणजी (गोवा) - नव्या झुआरी पुलाच्या तसेच उड्डाल पुलाच्या बांधकामामुळे आगशी - कुठ्ठाळ्ळी मार्गावर गेले कित्येक दिवस वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या निषेधार्थ आज गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने कुट्ठाळ्ळी जंक्शनवर आंदोलन केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व महिला प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह सुमारे 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या रस्त्यावर नेहमीच चक्काजाम होत असल्याने वाहन चालकांमधून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. या रस्त्यावरील खड्डे यामुळे वाहन चालकांनाही धोका निर्माण होऊन वाहन चालविणे कठीण बनले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी झुआरी पुलावरून चालत जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Congress Agitation Against Chakkajam at Kutthakali