प्रियंका आल्या.. आता भाजपला धक्का देण्याचं स्वप्न पूर्ण होईल?

बुधवार, 23 जानेवारी 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी कॉंग्रेसने त्यांचा एक हुकमी एक्का मैदानात उतरविला आहे.. हा एक्का म्हणजे प्रियंका गांधी! गेली अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून कटाक्षाने दूर राहिलेल्या प्रियंका यांना कॉंग्रेसने आता अधिकृतरित्या राजकारणात उतरविले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपची चार वर्षांपूर्वी विजयी घोडदौड सुरू झाली होती. आता आगामी निवडणुकीत मोदी-शहा जोडगोळीला रोखण्यासाठी कॉंग्रेसला धक्कातंत्र वापरावेच लागणार होते. 

शिवाय, देशाच्या पंतप्रधानपदाचा रस्ता उत्तर प्रदेशमधून जात असल्याने तिथे दणदणीत कामगिरी करण्याची गरज आहे. त्यातच, मायावती आणि अखिलेश यादव यांनी कॉंग्रेसशिवायच आघाडी करण्याची घोषणाही करून टाकली. त्यामुळे मनोधैर्य उंचावण्यासाठी कॉंग्रेसला ही खेळी करावी लागली, असे दिसत आहे..

प्रियंका यांच्या राजकारण प्रवेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला फायदा होईल का? मांडा तुमचे मत..!

Web Title: Congress aims to tackle Narendra Modi Amit Shah combination with Priyanka Gandhi appointment