काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप अंतिम; कोण किती जागा लढविणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

पवार यांच्या निवासस्थानी विरोधी नेत्यांची बैठक 
संसद अधिवेशन संपताच लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी विरोधक पुन्हा एकत्र आले आहेत. याअंतर्गत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक रंगली. एकमेकांशी फटकून राहणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रथमच या निमित्ताने एकमेकांशी संवाद साधल्याचे कळते. 

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे महाराष्ट्रातील जागावाटप अंतिम झाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय झाला. मात्र, कोण किती जागा लढविणार, याचा तपशील समजलेला नाही. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने 26; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 21 जागा लढविल्या होत्या. 

पवार यांच्या निवासस्थानी विरोधी नेत्यांची बैठक 
संसद अधिवेशन संपताच लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी विरोधक पुन्हा एकत्र आले आहेत. याअंतर्गत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक रंगली. एकमेकांशी फटकून राहणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रथमच या निमित्ताने एकमेकांशी संवाद साधल्याचे कळते. 

शरद पवार यांच्या निवासस्थानी तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुक अब्दुल्ला, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलुगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली. राहुल गांधीही उशिरा या बैठकीत सहभागी झाले होते. 

तत्पूर्वी, आज दुपारीच महाराष्ट्रातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीसंदर्भात शरद पवार आणि राहुल गांधी यांची दीर्घकाळ चर्चा झाली होती. या वेळी कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया सुळे, के. सी. वेणुगोपाल, प्रफुल्ल पटेल हजर होते. यादरम्यान जागावाटपात शिल्लक राहिलेल्या मतदारसंघांसंदर्भात; तसेच संभाव्य उमेदवारांबाबतही चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीनंतर लगेचच रात्री पुन्हा एकदा पवार आणि राहुल यांची अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय राजकारण, राज्यनिहाय आघाडी या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचेही सांगितले जाते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress and NCP seat sharing almost confirm of Loksabha election