तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची चौकशी करा: काँग्रेस

तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची चौकशी करा: काँग्रेस

हैदराबाद: गेल्या चार वर्षांत जमविलेल्या प्रचंड संपत्तीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी प्राप्तिकर विभागाने तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यासह तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) 40 आमदारांना नोटीस बजावली आहे. नोटिशीचे स्वागत करीत प्राप्तिकर खात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसने सोमवारी केली. 

तेलंगण प्रदेश कॉंग्रेस समितीचे खजिनदार गुडुर नारायण रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की सत्ताधारी "टीआरएस'च्या आमदारांनी गैरमार्गाने प्रचंड मालमत्ता केली यात कोणतीही शंका नाही. त्यांचे ज्ञात उत्पन्नाचे स्रोत पाहता ही मालमत्ता बेहिशेबी आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जनतेचा पैसा लाटला असून, प्राप्तिकर विभागाने याची उच्चस्तरीय चौकशी करावी किंवा "सीबीआय', न्यायालयीन चौकशीची शिफारस करावी. 

केसीआर कुटुंबीय आणि "तेलंगण'च्या आमदारांच्या संपत्तीत कमी कालावधीत प्रचंड वाढ झाली आहे. केसीआर कुटुंबाने अधिकृतपणे 100 कोटी रुपयांच्या क्‍लबमध्ये प्रवेश केला आहे. कोणताही ज्ञात व्यवसाय नसताना या कुटुंबाने 100 कोटींची माया जमविली असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला. केसीआर व त्यांच्या कुटुंबातील सर्व पाचही सदस्य पूर्ण वेळ राजकारणात आहेत हे जगजाहीर आहे. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष कोणताही व्यवसाय न करता मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे, असेही ते म्हणाले. 

राव यांच्या मालमत्तेतील वाढ 

85.95 लाख रु. 
2004 

23.55 कोटी रु. 
2018 

2,638 टक्के 
एकूण वाढ 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com