CPM च्या कार्यक्रमात थरुरांना बंदी; काँग्रेसनं का घेतली कठोर भूमिका?

शशि थरुर या कार्यक्रमात सहभागी झाल्यास त्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.
Shahshi Tharoor
Shahshi TharoorTeam eSakal

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) 23 व्या चर्चासत्रात काँग्रेस नेते उपस्थित राहू शकणार नाहीत. पुढच्या महिन्यात कन्नूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात कोणत्याही काँग्रेस नेत्याला उपस्थित राहण्यास काँग्रेसने मनाई केली आहे. तरीही जर कोणी पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन चर्चासत्रात सहभागी झालाच, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही पक्षाने स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी माकपनेही या कारवाईवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Shahshi Tharoor
'हिजाब'साठी परीक्षा टाळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परत परीक्षा नाही; विद्यापीठाचा मोठा निर्णय

सी.पी.आय(एस) ने काँग्रेस खासदार शशी थरूर आणि माजी केंद्रीय मंत्री के.व्ही. थॉमस यांना या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. यादरम्यान दोन्ही नेते राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार होते. थरूर यांना धर्मनिरपेक्षता आणि आव्हानांवर बोलण्यासाठी त्यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं होतं. तर थॉमस यांना राज्य आणि केंद्र नेतृत्वावर बोलण्यास सागंण्यात आलं आहे.

Shahshi Tharoor
गोवा : प्रमोद सावंतांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार का? बैठकीनंतर होणार घोषणा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन म्हणाले की, पक्षाने यासंदर्भात खासदारांसह सर्व नेत्यांना सूचना दिल्या आहेत. "कोणताही नेता सीपीआय(एम) च्या सेमिनारला उपस्थित राहिला तर त्याला कारवाईला सामोरं जावं लागेणार आहे" असं ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, प्रस्तावित सेमी-हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या नावाखाली सीपीआय(एम) लोकांचा छळ करत असताना, अशा कोणत्याही चर्चासत्रात नेते सहभागी झाले तर काँग्रेस नेत्यांच्या विरोधात नकारात्मक भावना निर्माण होईल. त्यामुळे लोकांच्या भावना लक्षात घेऊन चर्चासत्रात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली असं ते म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com