काँग्रेसने मोदींना Amazonवरून पाठवलं 170 रुपयांचं खास गिफ्ट; काय आहे?

वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

CAAवरून विरोधीपक्ष भाजप आणि मोदी-शहा यांच्याविरोधात आक्रमक असतानाच प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यघटनेची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. Amazonवरून ही प्रत मोदींच्या पत्त्यावर पाठविण्यात आली आहे. या प्रतीची मूळ किंमत 170 रुपये आहे.

नवी दिल्ली : CAAवरून विरोधीपक्ष भाजप आणि मोदी-शहा यांच्याविरोधात आक्रमक असतानाच प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यघटनेची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. Amazonवरून ही प्रत मोदींच्या पत्त्यावर पाठविण्यात आली आहे. या प्रतीची मूळ किंमत 170 रुपये आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला असून देशात, समाजात विभाजन घडवलं जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. देशात फुट पाडण्याच्या तुमच्या कामातून वेळ मिळाला तर हे पुस्तक जरूर वाचा असा खोचक सल्लाही काँग्रेसने पंतप्रधान मोदींना दिला आहे. काँग्रेसने यासंबधी ट्वीटही केले आहे. राज्यघटनेचं पुस्तक लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल असेही काँग्रेसने म्हटले आहे.

तत्पूर्वी, पंधरा डिसेंबरला राजधानी दिल्लीतील शाहीन बाग परिसरात CAAच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू होऊन जवळपास ४५ दिवसाचा कालावधी झाला आहे. अजूनही हे आंदोलन थांबलेले नाही. जोपर्यंत CAAपरत घेतले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इरादा शाहीन बाग आंदोलनकर्त्यांनी  केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress buys copy of Constitution from Amazon, gifts to Modi with a message