'टूट गयी विकास की डोर, वापस चलो काँग्रेस की ओर...'

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून, याचे सेलिब्रेशन दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर पाहायला दिसत आहे. 

काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पोस्टर आणि बॅनर लावले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मिळाला ऐतिहासिक विजय. 'टूट गयी विकास की डोर, वापस चलो काँग्रेस की ओर...' असे बॅऩर दिल्लीत झळकले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर या निकालामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला आज (मंगळवार) धक्का बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सत्तेला काँग्रेसने जोरदार धक्का दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये पारडे समान आहे, तर राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पूर्ण वर्चस्व राखत भाजपची सत्ता हिसकावून घेतली.

Web Title: Congress celebrates by putting banners in offices