काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Congress Chhattisgarh Working President Ramdayal Uike Joined Bjp In Presence Of Amit Shah
Congress Chhattisgarh Working President Ramdayal Uike Joined Bjp In Presence Of Amit Shah

रायपुर- विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला जोरदार झटका बसला आहे. छत्तीसगढ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अदिवासी नेते रामदयाल उइके यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत रामदयाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रामदयाल उइके यांनी भाजप अध्यक्ष आणि रमण सिंहा यांच्यासमोर भाजप सदस्यपद ग्रहण केले. रामदयाल हे काँग्रेसचे मोठे नेते होते. ते सध्या पाली तानाखार या मतदार संघातून विधानसभा सदस्य आहेत. रामदयाल यांच्या प्रवेशावरून मुख्यमंत्री रमण सिंह यांनी काँग्रेस पक्षात नेते आणि कार्यकर्ते खुश नसल्याचे सांगितले आणि म्हणूनच काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आणखी काही काँग्रेस नेते संपर्कात असल्याचेही रमण सिंह यांनी सांगितले आहे.

दरम्यान, रामदयाल यांना भाजप विधानसभेसाठी तिकीट देणार की नाही हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. तिकीटाच्या मुद्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे यावेळी रमण सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com