ब्राम्हण समाजाचा 'डीएनए' काँग्रेस पक्षात : सुरजेवाला

Congress claims Brahmin Samaj runs in partys blood says Surejwala
Congress claims Brahmin Samaj runs in partys blood says Surejwala

नवी दिल्ली : ब्राम्हण समाजाचा डीएनए काँग्रेस पक्षाच्या रक्तात आहे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (बुधवार) सांगितले. 

हरियानाच्या कुरक्षेत्र येथे ब्राम्हण समाजाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरजेवाला बोलत होते. ते म्हणाले, ब्राम्हण समाजाच्या सभेपूर्वी या समाजाच्या पोस्टरवर राहुल गांधी यांचा फोटो, पक्षाचा झेंडा आणि तिरंगा का ? असा सवाल माझ्या एका सहकाऱ्याने मला केला होता. त्यावर मी त्यांना म्हणालो, एक दिवस मी याचे उत्तर ब्राम्हण समाजाच्या या ठिकाणावरून देईन. भारतीय काँग्रेस पक्ष हा तो पक्ष आहे, माझ्या मित्रांनो, त्याच्या रक्तात ब्राम्हण समाजाचे डीएनए आहेत, असे सुरजेवाला यांनी सांगितले. 

तसेच ते पुढे म्हणाले, जर आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास गरिब जनतेला 10 टक्के आरक्षण देण्यात येईल आणि ब्राम्हण कल्याण बोर्डाची स्थापना केली जाईल. या बोर्डामार्फत 100 कोटींचे कर्ज आणि ब्राम्हण समाजातील गरजू तरुणांना व्यवसायासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी 4 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com