काँग्रेसनेच हिंदू दहशतवाद आणला : जेटली

काँग्रेसनेच हिंदू दहशतवाद आणला : जेटली

नवी दिल्ली : हिंदू दहशतवाद हे काँग्रेसने रचलेले षड्यंत्र आहे. हिंदू दहशतवाद शब्दाचा वापर करुन या समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम काँग्रेसने केले. कोणतेही ठोस पुरावे नसताना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारकडून (यूपीए) 'समझोता' प्रकरणासाठी विलंब लावला गेला, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच काँग्रेसनेच हिंदू दहशतवाद आणला असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी स्वामी असीमानंद यांच्यासह अन्य तीन आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याच मुद्यावरून भाजपने सांगितले, की काँग्रेसकडून जाणूनबुजून हिंदू दहशतवाद हा शब्द आणला जात आहे. त्यांनी मतांसाठी हिंदू दहशतवादाची संकल्पना मांडली. ही संकल्पना बनविण्यासाठी चुकीच्या माणसांना पकडण्यात आले. सुनावणीदरम्यान अनेक तर्क लावण्यात आले होते, असा दावाही जेटली यांनी केला. 

जेटली पुढे म्हणाले, की हिंदू दहशतवाद हा काँग्रेसकडून वापरला गेलेला शब्द आहे. या शब्दाचा वापर करुन या समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम काँग्रेसने केले. तसेच जे खरे आरोपी होते त्यांना शिक्षा मिळाली नाही. सामान्य लोकांचे जीव गेले. याची जबाबदारी यूपीएने आणि काँग्रेसने घ्यायला हवी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com