ब्रिटिशांचे 'फोडा आणि राज्य करा' हेच संघाचे धोरण : काँग्रेस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

नवी दिल्ली - केरळच्या मुख्यमंत्र्यांना मारून त्यांचे शीर आणणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्याच्या वक्तव्यावर कॉंग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त संघावर टीका केली आहे. संघाची फोडा आणि राज्य करा हे ब्रिटिशांसारखे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोरण असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

केरळमधील शाहीद पार्क येथे संघाच्या वतीने गुरुवारी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे प्रमुख कुंदन चंद्रावत यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना मारणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. बक्षिसाची रक्कम देण्यासाठी मी स्वत:ची मालमत्ता विकेल, असेही चंद्रावत यांनी जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने संघावर निशाणा साधला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते शकील अहमद म्हणाले, 'ब्रिटिशांसारखे फोडा आणि राज्य करा हे संघाचे जुने धोरण आहे. या धोरणामुळे समाजात फूट पाडून भारतीय जनता पक्षाला लाभ मिळवून देण्यात येत आहे.'

दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Congress critic on RSS regarding Kerala CM