येडियुरप्पा यांच्या मुलाने काँग्रेस आमदारांना ठेवले डांबून

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

काँग्रेस नेता व्ही. एस. उग्रप्पा यांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे, की भाजप नेते बी. वाय. विजयेंद्र यांनी काँग्रेस आमदाराच्या पत्नीला फोन करून येडियुरप्पा यांना मतदान करण्यास सांगितले. त्याबदल्यात त्यांना 15 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. 

बंगळूर - कर्नाटकमध्ये विश्वासदर्शक ठरावाची वेळ जवळ येत असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता काँग्रेसने आमच्या दोन आमदारांना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मुलाने डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे आमदार आनंद सिंह आणि प्रताप गौडा पाटील यांना बंगळूरमधील हॉटेल गोल्डन फिंचमध्ये बंधक बनवून ठेवले आहे. या प्रकरणी बंगळूर अतिरिक्त पोलिस आयुक्त सीमानाथ कुमार सिंह आपल्या पथकासह हॉटेलमध्ये पोहचले असून, शोध घेण्यात येत आहे. हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

काँग्रेस नेता व्ही. एस. उग्रप्पा यांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे, की भाजप नेते बी. वाय. विजयेंद्र यांनी काँग्रेस आमदाराच्या पत्नीला फोन करून येडियुरप्पा यांना मतदान करण्यास सांगितले. त्याबदल्यात त्यांना 15 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. 

Web Title: Congress criticize BJP on #KarnatakaFloorTest