सुषमांनी घ्यावी मोदींची शिकवणी: कॉंग्रेसचा टोला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

"मन की बात' हवी बेरोजगारी, महागाईवर 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "मन की बात' या रेडिओ कार्यक्रमावरही अजोयकुमार यांनी टीकास्त्र सोडले. एकीकडे बेरोजगारी, विद्यार्थिनींवर हल्ले, महागाई आणि दुसरीकडे काही उद्योगपतींना प्रोत्साहन अशी मोदी सरकारची तीन वर्षे असल्याचा चिमटा कॉंग्रेस प्रवक्ते अजोयकुमार यांनी काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना मारहाण होते आणि त्यांच्या आंदोलनामुळे पंतप्रधानांना त्यांचा मार्ग बदला लागतो, याकडे लक्ष वेधून अजोयकुमार म्हणाले, की वाढती बेरोजगारी, महागाई, काश्‍मीर सीमेवरील बिघडलेली परिस्थिती यावरही पंतप्रधानांनी बोलायला हवे होते.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला फटकारणाऱ्या भाषणावरून कॉंग्रेस पक्षाने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रशंसा केली आहे. मात्र, सुषमा स्वराज यांचे भाषण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्ञान वाढविणारे होते, त्यामुळे भारतात परतल्यानंतर सुषमांनी मोदींची शिकवणी घ्यावी, असा टोलाही कॉंग्रेसने लगावला आहे. 

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारत आणि पाकिस्तानची तुलना करताना आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांचा उल्लेख केला; तसेच भारताने डॉक्‍टर, इंजिनिअर दिले, तर पाकिस्तानने दहशतवादी दिले, अशी टीका केली होती. त्याचा आधार घेत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्‌विटरवर मोदी सरकारला कोपरखळी मारली. कॉंग्रेसने आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांची निर्मिती केल्याचे सरकारने मान्य केले, याबद्दल आभार मानणारे खोचक ट्‌विट कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. 

कॉंग्रेसचे प्रवक्ते अजोयकुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की पंतप्रधान मोदींनी इतिहास वाचला असता, तर त्यांना कळाले असते. कॉंग्रेसच्या काळातच आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांची स्थापना झाली. देशाला स्वयंपूर्ण बनविणारी श्‍वेतक्रांती, हरितक्रांती झाली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कॉंग्रेसच्या कामगिरीचा उल्लेख केल्याबद्दल सुषमा स्वराज यांचे आभार मानायला हवे. भारतात परतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींना भेटून गेल्या साठ वर्षांत देशात काय झाले तेही सांगावे. 

"मन की बात' हवी बेरोजगारी, महागाईवर 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "मन की बात' या रेडिओ कार्यक्रमावरही अजोयकुमार यांनी टीकास्त्र सोडले. एकीकडे बेरोजगारी, विद्यार्थिनींवर हल्ले, महागाई आणि दुसरीकडे काही उद्योगपतींना प्रोत्साहन अशी मोदी सरकारची तीन वर्षे असल्याचा चिमटा कॉंग्रेस प्रवक्ते अजोयकुमार यांनी काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना मारहाण होते आणि त्यांच्या आंदोलनामुळे पंतप्रधानांना त्यांचा मार्ग बदला लागतो, याकडे लक्ष वेधून अजोयकुमार म्हणाले, की वाढती बेरोजगारी, महागाई, काश्‍मीर सीमेवरील बिघडलेली परिस्थिती यावरही पंतप्रधानांनी बोलायला हवे होते. 

Web Title: Congress criticize Narendra Modi