भाजपने जम्मू-काश्मीरची वाट लावली : काँग्रेस

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

'जे काही झाले ते चांगले झाले. जम्मू-काश्मीरच्या जनतेला आता आराम मिळेल. भाजपने राज्याची वाट लावली आणि आता सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला'',.

- काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली : भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले, की ''जे काही झाले ते चांगले झाले. जम्मू-काश्मीरच्या जनतेला आता आराम मिळेल. भाजपने राज्याची वाट लावली आणि आता सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला'', अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस पीडीपीला पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

आम्ही जनतेचा कौल मान्य करतो. जर आम्ही या राज्यात सरकार स्थापन करू शकलो नाही तर राज्यात राज्यपाल किंवा राष्ट्रपती शासन नियुक्त केले जाईल.

- राम माधव, राष्ट्रीय महासचिव, भाजप

आम्ही सायंकाळी 5 वाजता यावर सविस्तर बोलणार आहोत. तोपर्यंत मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. 

- नाईम अख्तर, नेते, पीडीपी

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे. भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती देशद्रोही युती होती.

- संजय राऊत, खासदार, शिवसेना

राज्याची वाट लावून भाजप सत्तेतून बाहेर पडले.

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

काश्मिरच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास पीडीपी आणि भाजपचे सरकार अपयशी ठरले. 

- असदुद्दीन ओवेसी, अध्यक्ष, एमआयएम

Web Title: Congress Criticizes BJP Over Jammu Kashmir Issue