'NaMoApp' वरून काँग्रेसचा मोदींवर निशाणा

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

काही दिवसांपूर्वी फेसबुक डाटा लीक होत असल्याच्या संशयावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नमो अॅप'वरून मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत 'NaMoApp' अँड्राइड अॅपवरून मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. 'NaMoApp' या अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खासगी आणि वैयक्तिक माहिती उघड केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ##DeleteNaMoApp मोहीमही राबवण्यात येत आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 

Narendra modi

काही दिवसांपूर्वी फेसबुक डाटा लीक होत असल्याच्या संशयावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नमो अॅप'वरून मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर राहुल गांधींनी ''माझे नाव नरेंद्र मोदी. मी भारताचा पंतप्रधान आहे. जेव्हा तुम्ही माझ्या अधिकृत अॅपवर साइन-अप कराल, तेव्हा तुमची वैयक्तिक माहिती मी माझ्या मित्रांना अमेरिकी कंपनीला देईन''. तसेच त्यांनी माध्यमांचे आभारही मानले. तुम्ही उत्तम कामगिरी केली, असे उपरोधिक ट्विट केले. 

android

दरम्यान, 'नमो अॅप'चा वापर करणाऱ्या लोकांची खासगी माहिती त्यांच्या परवानगीशिवाय अमेरिकी कंपन्यांना दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेसने याच मुद्यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपला कोंडीत पकडले आहे.

Web Title: Congress Criticizes On Modi Government on the issue of NaMoApp