आणखी एक सरकार पाडण्याचा मोदींचा प्रयत्न?: काँग्रेस

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - तमिळनाडूतील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. 'लोकांनी निवडून दिलेले आणखी एक सरकार पाडण्याचा मोदींचा प्रयत्न आहे का?', असा प्रश्‍न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

एआयडीएमकेच्या सचिव व्ही. के. शशिकला यांनी पक्षाचे खजिनदार ओ. पनीरसेल्वम यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेत त्यांच्या जागी डिंडिगुल श्रीनिवासन यांची नियुक्ती केली आहे. पनीरसेल्वम यांचे विरोधी पक्षांसोबत साटेलोटे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर, जयललिता आजारी असताना त्यांना एकदाही भेटू न दिल्याचा खुलासा पनीरसेल्वम यांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनी ट्‌विटरद्वारे मोदींवर निशाणा साधला आहे.

'राज्यपालांनी शपथविधी समारंभास घेण्यास नकार दिल्याने पदावरून जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी केली. लोकनियुक्त सरकारवर पाडण्याचा मोदींचा हा एक प्रयत्न आहे?', असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. "उत्तर प्रदेश, अरुणाचल, आसाम आणि उत्तर प्रदेशनंतर भारतीय जनता पक्षाने एखाद्याला त्याच्या पक्षापासून दूर नेण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळविले आहे', अशी टीकाही सूरजेवाला यांनी केली आहे.

Web Title: Congress critics on Narendra Modi