
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत समसमान म्हणजे प्रत्येकी 125 जागांवर लढण्याचे ठरविले असून, उर्वरित 38 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. या मित्रपक्षांमध्ये समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, शेतकरी स्वाभिमानी पक्ष, डावे पक्ष यांचा समावेश असून, वाढीव जागांची मागणी त्यांच्याकडून सुरू आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 50 उमेदवारांची यादी शुक्रवारी (ता. 20) जाहीर होणार आहे. तसेच, मित्रपक्षांसाठी सोडावयाच्या जागांबाबत उद्या (ता. 19) मुंबईतील बैठकीत निर्णय अपेक्षित असून, मित्रांसाठी काँग्रेसचे धोरण लवचिक राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज येथे सांगितले.
शिवसेनेच्या "आरे'ला भाजपचे नाणारचे "कारे'
काँग्रेस छाननी समितीची बैठक आज दिल्लीत दोन टप्प्यांत झाली. प्रदेश प्रभारी व सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे, छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.
Video : आपल्या डोळ्यासमोरच भाजप-संघाची समाप्ती होईल : मेवाणी
आजच्या बैठकीत जवळपास 75 उमेदवारांच्या यादीवर अंतिम हात फिरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, नाना पटोले यांचा समावेश असल्याचे समजते. छाननी समितीने निवडलेल्या नावांवर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतर औपचारिक उमेदवार यादी जाहीर केली जाईल. त्यानुसार 50 उमेदवारांच्या नावांची घोषणा शुक्रवारी (ता. 20) होणार आहे.
मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा; शाळांना सुटी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत समसमान म्हणजे प्रत्येकी 125 जागांवर लढण्याचे ठरविले असून, उर्वरित 38 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. या मित्रपक्षांमध्ये समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, शेतकरी स्वाभिमानी पक्ष, डावे पक्ष यांचा समावेश असून, वाढीव जागांची मागणी त्यांच्याकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या जागावाटपावरील निर्णय उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत होईल. अर्थात, मित्रपक्षांना जागा सोडण्यासाठी काँग्रेसचे धोरण फार कठोर राहणार नसल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. याखेरीज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काही जागा सोडण्यावरही चर्चा झाली असून, मुंबईतील 36 जागांपैकी सहा ते सात जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची तयारी असल्याचे मुंबई प्रदेश काँग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे.