Delhi Elections : काँग्रेस शून्यावरच; दिल्ली प्रदेशाध्यक्ष देणार राजीनामा

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

७० विधानसभा मतदारसंघांसाठी होणाऱ्या या राजधानीच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस मात्र आपलं खातं अजूनही उघडू शकलं नाही.  काँग्रेस अजूनही भोपळ्यावरच आहे. याच मानहानिकारक पराभवामुळे दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोपडा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 नवी दिल्ली : दिल्लीत आज (ता. ११) पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा करिष्मा दिसला. भाजप व काँग्रेसला धोबीपछाड देत आप जवळपास ५८ जागांवर आघाडीवर आहे. ७० विधानसभा मतदारसंघांसाठी होणाऱ्या या राजधानीच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस मात्र आपलं खातं अजूनही उघडू शकलं नाही.  काँग्रेस अजूनही भोपळ्यावरच आहे. याच मानहानिकारक पराभवामुळे दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोपडा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for subhash chopda
सुभाष चोपडा

८ फेब्रुवारीला झालेल्या दिल्ली विधानसभा मतदानाचे निकाल आज समोर येत आहेत. आपने अपेक्षेप्रमाणे मुसंडी मारली असून, भाजपनेही मागील निवडणूकीपेक्षा बरी कामगिरी केली आहे. आप जवळपास ५८ जागांवर आघाडीवर असून, भाजप १२ जागांवर कूच करत आहे. पण, सगळ्यात धक्कादायक म्हणजे काँग्रेसचा एकही उमेदवार आतापर्यंत आघाडीवर येऊ शकला नाही. त्यामुळे अजूनही काँग्रेस शून्यावरच आहे. सकाळच्या टप्प्यातील मतमोजणीतही काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळवता आली नव्हती. राहुल गांधी व काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी प्रचार करूनही दिल्लीत विधानसभेतस काँग्रेसला जागा मिळाली नाही. या पराभवाची जबाबदारी घेत दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोपडा यांनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले. इतका प्रचार व काम करुन पराभव का झाला याचा अभ्यास करणार असल्याचेही चोपडा यांनी सांगितले. 

Delhi Elections : 'आप'ला धक्का, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर

मागील दिल्ली विधानसभा निवडणूकीत आपला ६७ तर भाजपला ३ जागा होत्या, याही वेळीही काँग्रेस शून्यावरच होती. त्यामुळे काँग्रेसचा २०१५ मधील पॅटर्न या निकालात बघायला मिळणार का अशी चर्चा होत आहे. 

आपचा जल्लोष
सकाळच्या टप्प्यातील कल जाहीर होत असताना आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हं असल्यामुळं दिल्लीत आम आदमी पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. आपच्या कार्यालयात सजावट करण्यात आलीय. मिठाईच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे. ढोल-ताशे आणि मिठाई, अशी विजयोत्सवाची सगळी तयारी करण्यात आली आहे. 

केजरीवालांच्या घरी आज 'डबल सेलिब्रेशन'; हे आहे दुसरं खास कारण!

भाजप कार्यालयाबाहेर शुकशुकाट
भाजपनं या निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांची निवडणूक रणांगणात उतरवली होती. दिल्लीतील खासदार आणि प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्याकडं या निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली. स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीत लक्ष घातलं होतं. पण, भाजपला अपेक्षित यश आलं नाही. भाजपनं दिल्लीत सत्तांतर करण्याचा अक्षरशः विडा उचलला होता. शाहीनबाग आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत, अरविंद केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण, या गळ्या प्रयत्नांनंतरही भाजपला अतिशय माफक यश मिळालं. त्यामुळं भाजपच्या गोटात निराशा दिसत आहे. एरवी कार्यकर्त्यांनी गजबजणारे भाजपचे मुख्यालय आज शांत शांत होते. मुख्यालयात अक्षरशः शुकशुकाट होता. कार्यकर्तेच नव्हे तर, नेतेही या कार्यालयाकडं फिरकले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Delhi President Subhash Chopda will resign due to defeat in Delhi Elections