फॉर्मेलिनयुक्त मासळी प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची काँग्रेसची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

सभापतींनी या फॉर्मेलिन मुद्यावरील स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर शून्य तासाच्यावेळी फॉर्मेलिन विषयावरील लक्षवेधी सूचना कामकाजात चर्चेस घेतली.

गोवा - राज्यात आयात होणाऱ्या मासळीसाठी ती कुजू नये म्हणून फॉर्मेलिनचा वापर केला जात असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आज काँग्रेसने तसेच काही सत्ताधारी आमदारांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवेळी केली. 

सभापतींनी या फॉर्मेलिन मुद्यावरील स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर शून्य तासाच्यावेळी फॉर्मेलिन विषयावरील लक्षवेधी सूचना कामकाजात चर्चेस घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याचे उत्तर दिल्यानंतर सभागृहातील सत्ताधारी व विरोधी आमदारांनी त्यावर चर्चा करत सरकारने जनतेच्या आरोग्याबाबत गंभीरपूर्वक विचार करण्याची मते मांडली. फॉर्मेलिनचा वापर करून गोव्यात आयात केलेल्या मासळी माफियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. हा विषय गोमंतकियांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने मासे खाण्यास हरकत नाही हा लोकांचा ढळलेला विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी ही चौकशी करावी असा सूर विरोधकांनी व्यक्त केला.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Congress demand for Judicial inquiry of Formaline containing fish case