केरळचा पूर राष्ट्रीय संकट जाहीर करा- राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये जलप्रलयाचा आढावा घेत असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केरळमधील पूरसंकट हे राष्ट्रीय संकट म्हणून जाहीर करावे, अशी मागणी आज केली. त्याचबरोबर, कॉंग्रेसचे सर्व खासदार आणि आमदारांनी केरळच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णयही केला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये जलप्रलयाचा आढावा घेत असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केरळमधील पूरसंकट हे राष्ट्रीय संकट म्हणून जाहीर करावे, अशी मागणी आज केली. त्याचबरोबर, कॉंग्रेसचे सर्व खासदार आणि आमदारांनी केरळच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णयही केला आहे.

राहुल गांधींनी ट्विट द्वारे पंतप्रधान मोदींकडे केरळचा पूर हे राष्ट्रीय संकट म्हणून तातडीने जाहीर करावे, असे आवाहन केले. राज्यातल्या लाखो जणांचे प्राण, त्यांची रोजीरोटी आणि भविष्यपणाला लागले असल्याकडेही राहुल यांनी लक्ष वेधले आहे. तसेच कॉंग्रेसचे सर्व सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्ष नेत्यांच्या आज झालेल्या बैठकीतही राहुल गांधींनी केरळमधील पूर संकटावर चिंता व्यक्त करताना मदतीच्या मागणीचा पुनरुच्चार केला. मात्र मोदी सरकार संकटप्रसंगी मदत करताना भाजपशासित राज्ये आणि भाजपेतर पक्षांची सत्ता असलेली राज्ये असा मतभेद करत असल्याचा गंभीर आरोपही केला. 
 

देशभरात पुराने थैमान घातले असून, केरळमधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. 423 जण मृत्युमुखी पडले. त्यातील 182 एकट्या केरळमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, केरळच्या मदतीसाठी काँग्रेसशासित राज्ये पुढे सरसावली आहेत. पंजाब सरकारने 10 कोटी रुपये दिले आहेत. कर्नाटक सरकारने 10 कोटी रुपये, तर पुद्दूचेरी सरकारने एक कोटी रुपये दिले आहेत. तसेच, कॉंग्रेसचे सर्व खासदार, तसेच सर्व राज्यांमधील आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन केरळसाठी द्यावे, असेही काँग्रेसच्या एका बैठकीत ठरले आहे. 
 

Web Title: Congress demands Kerala floods be declared as national disaster