शिवकुमार यांच्यासह देवरा, निरुपम, नसीम खान पोलिसांच्या ताब्यात

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

रेनिसन्स हॉटेलमध्ये असलेल्या कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना भेटायला आलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरुपम काँग्रेस नेते नसीम खान आणि  यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबई : रेनिसन्स हॉटेलमध्ये असलेल्या कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना भेटायला आलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरुपम काँग्रेस नेते नसीम खान आणि  यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हॉटेलच्या बाहेर थांबलले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. कर्नाटकमधील नाराजीनाट्य सुरु असताना मुंबईतील हॉटेलमध्ये थांबलेल्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आलेले काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार हे आले होते.

मुंबईतील रेनेसाँन्स हॉटेलमध्ये थांबलेल्या कर्नाटकच्या आमदारांनी पोलिसांना पत्र लिहून शिवकुमार यांना भेटण्याची इच्छा नसून, त्यांना हॉटेलच्या परिसरात फिरकू देवू नये अशी विनंती केली आहे. आज सकाळपासून हॉटेल परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress DK Shivakumar, Milind Deora Detained Outside Mumbai Hotel