"कॉंग्रेसला माझी गरज उरली नाही"

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

बंगळूर : कॉंग्रेस पक्षाला लोकनेत्याची नव्हे, तर फक्त व्यवस्थापकांची गरज आहे, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांनी आज पत्रकार परिषदेत केला. वयामुळे दुर्लक्ष केला जात असून, कॉंग्रेसला माझी गरज उरली नाही, असेही कृष्णा म्हणाले.

कृष्णा यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला असला, तरी पुढील वाटचालीबाबत उत्तर देण्याचे त्यांनी सोईस्कररीत्या टाळले.
कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजिनामा दिल्याची घोषणा कृष्णा यांनी काल (शनिवारी) केली होती. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबरोबरच केंद्रीय परराष्ट्रमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कृष्णा यांनी काम पाहिले आहे.

येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत 84 वर्षीय कृष्णा म्हणाले, "कॉंग्रेसला सध्या माझी गरज उरलेली नाही. माझे वय झालेले असल्यामुळे पक्षाकडून माझ्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे मी कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.'' कॉंग्रेस सोडल्यानंतर कुठल्या पक्षात प्रवेश करणार या प्रश्‍नाला कृष्णा यांनी उत्तर देण्याचे टाळले.

Web Title: congress does not need me anymore, says krishna