काँग्रेस माझ्या आईला विनाकारण राजकारणात ओढतंय- नरेंद्र मोदी

काँग्रेस माझ्या आईला विनाकारण राजकारणात ओढतंय- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली-  माझ्या आईला राजकारणातला र देखील माहीत नाही. काँग्रेसकडे माझ्याविरोधात बोलण्यासारखे मुद्दे उरलेले नाहीत. म्हणून आता माझ्या आईला नावे ठेवली जात आहेत. माझ्या आईचा अपमान केला जातो आहे. तिला विनाकारण काँग्रेस राजकारणात ओढत असल्याचा आरोप आज (ता.24) पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. मध्यप्रदेश आणि इतर राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

काँग्रेस नेते राज बब्बर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी रुपयाच्या घसरणीचे मूल्यमापन मोदींच्या आईच्या वाढत्या वयासोबत केले होते. त्या संदर्भात मोदींनी आपल्या भाषणातून काँग्रेस पक्षावरच टीका केली आहे. ते पुढे याविषयी बोलताना म्हणाले की, पूजा करणे, देवासमोर जप करत आपला वेळ घालवणे ही माझ्या आईची दिनचर्या आहे. माझ्याशी सामना न करता येणाऱ्या काँग्रेसने माझ्या आईलाही राजकारणात खेचले आहे, हे अत्यंत चुकीचे असल्याचेदेखिल त्यांनी म्हटले आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पक्षाने देशावर सर्वात जास्त काळ राज्य केले ते त्या जबाबदार पक्षाचे लोक माझा सामना करण्याऐवजी माझ्या आईवरून माझ्यावर टीका करत आहेत ही खरोखरच लाजिरवाणी बाब आहे अशी खंतही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com