काँग्रेसकडून मोदींना 'पर्यटन दिनाच्या शुभेच्छा'

PM-Narendra-Modi
PM-Narendra-Modi

नवी दिल्ली : आज 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. या दिवसाचे औचित्य साधून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या आवडत्या पर्यटनस्थळाचे फोटो, त्याच्याशी निगडीत असलेल्या आठवणी, किस्से यांना सोशल मीडियाच्या भिंतीवर चिटकवून दिले. पर्यटक आणि पर्यटन यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ही चांगली गोष्ट आहे. अनेकांनी आजच्या दिवसाचे औचित्य साधत पुढील ट्रीपचा प्लॅनही आखला असेल, शुभेच्छा दिल्या असतील, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना या अनोख्या दिवसाच्या अनोख्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक परदेशी दौरे केले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने त्यांच्या या परदेशी दौऱ्यांच्या फोटोंचे एक कोलाज करून मोदींना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींना ट्विटरवरून शुभेच्छा देताना एक कोलाज केलेला फोटो काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाउंटवर अपलोड केला आहे. वेगवेगळ्या देशांच्या विमानतळावर त्यांचे स्वागत करताना मोदींनी केलेल्या अभिवादनाचे 18 फोटो या कोलाजमध्ये वापरले आहेत. तसेच WorldTourismDay हा हॅशटॅगही कॅप्शनमध्ये दिला आहे. 

केंद्रातील तसेच विविध राज्यांतील विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करतात. नुकतेच हाउडी मोदी या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी प्रियांका गांधीनीही मोदींवर टीका करताना म्हटले होते की, परदेशात कार्यक्रम आयोजित करून गुंतवणुकदार आपल्याकडे येत नसतात. केवळ दिखावा केल्याने, पाच ट्रिलियन बोलून किंवा माध्यमांना मॅनेज करून देशात आर्थिक सुधारणा होत नसते. 

पंतप्रधान मोदींचे परदेशी दौरे : आकडे बोलतात...

  1. पहिली टर्म संपल्यानंतर पंतप्रधान म्हणून मोदींची ही दुसरी टर्म सुरू आहे. तसेच त्यांचे परदेशी दौरेही सुरू आहेत. शपथविधी झाल्यानंतरच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत मोदींनी आतापर्यंत दहा देशांना भेटी दिल्या आहेत. सध्या ते अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
  2. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या टर्ममध्ये म्हणजे 55 महिन्यांमध्ये मोदींनी केलेल्या परदेशी दौऱ्यांची संख्या आहे एकूण 93. आणि त्यावर खर्च झाले एकूण 2021 कोटी रुपये.
  3. फेब्रुवारी 2019 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या परदेशी दौऱ्यांची बरोबरी केली आहे. 
  4. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 10 वर्षांत केलेले परदेशी दौरे आहेत 93
  5. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना त्यांनी 15 वर्षात केले होते 113 परदेशी दौरे 
  6. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 48 परदेशी दौरे केले. 
  7. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 68 परदेशी दौरे केले होते. 
  8. पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक दौऱ्यावर सरासरी 22 कोटी रुपये खर्च झाले, तर माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक दौऱ्यावर सरासरी 27 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 
  9. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे 2015 ला सर्वाधिक म्हणजे एकूण 24 देशांचे दौरे केले होते. 2014 मध्ये ते 13 देशांमध्ये गेले होते. तर 2016 आणि 2018 ला ते 18 देशांमध्ये गेले होते. त्यामध्ये मोदींनी अमेरिका (5 वेळा), फ्रान्स आणि जपान (3 वेळा) दौरा केेला आहे. 
  10. पंतप्रधान झाल्यानंतरच्या पुढील पाच वर्षात मोदींनी 49 परदेश दौरे केले. त्यावेळी त्यांनी 93 देशांना भेटी दिल्या. त्यापैकी 41 देश असे आहेत ज्याठिकाणी ते पहिल्यांदा गेले होते. तर 10 देशांमध्ये दोनदा गेले होते. फ्रान्स आणि जपानमध्ये प्रत्येकी 3 वेळा, रशिया, सिंगापूर, जर्मनी आणि नेपाळमध्ये प्रत्येकी 4 वेळा, तर चीन आणि अमेरिकेत प्रत्येकी 5 वेळा मोदी गेले आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com